डॅमेज रोखण्यासाठी खा.ओवैसी तीन दिवस औरंगाबाद शहरात करणार मुक्काम

Foto
औरंगाबाद : दलित आणि मुस्लिम मतदारांच्या जोरावर वंचित बहुजन आघाडी चितोड महाराष्ट्रात घडत असताना औरंगाबाद शहरामध्ये दलित आणि मुस्लिम नगरसेवक का मध्ये नाराजीचा सूर दिसत आहे हीच नाराजी दूर करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी हे तीन दिवस औरंगाबाद शहरात मुक्काम ठोकून आहेत. ऍड  प्रकाश आंबेडकर आणि एम आय एम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी  वंचित बहुजन आघाडी स्थापन केली मात्र काही दिवसातच औरंगाबादच्या जागेमुळे उभी फूट पडत असल्याची दिसून आले होते.  त्यानंतर इथला  उमेदवार बदलण्यात आला ऐनवेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांना औरंगाबाद लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली.  त्यानंतर एम आय एम पक्षांमध्ये असलेले चार नगरसेवक नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या हे चारही नाराज काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे देखील चर्चेला उधाण आले होते. 

 काही दिवसांपूर्वीच एम एम चा बालेकिल्ला समजला जाणारा कटकट गेट किराडपुरा रोशन गेट या भागांमध्ये नो एम आय एम असे होर्डिंग लावण्यात आले होते.  हे होल्डिंग नाराज नगरसेवकांनी लावल्याचे देखील बोलले जात होते, तर  एकीकडे मुस्लिम आमचे नगरसेवक नाराज असताना जे दलित नगरसेवक एमएम पक्षात आहेत त्यांनादेखील बैठकांना बोलविण्यात येत नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर दिसत आहे एकंदरीत पाहता   चार ते पाच नगरसेवक नाराज असल्याने व काँग्रेसच्या संपर्कात असल्याने इम्तियाज जलील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.  हीच नाराजी दूर करण्यासाठी एम आय ॲम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे आज संध्याकाळी सहा वाजता शहरात येणार आहेत ओवेसीच्या करिश्माने चार नगरसेवकांची नाराजी दूर होणार आहे का?  हे पाहणे उसुक्तादायक ठरणार आहे. मात्र काही नगरसेवक उघडपणे काँग्रेस च्या गोठ्यात  जाताना दिसत असल्याने त्यांची नाराजी दूर होणे शक्य नसल्याचे ही बोलले जात आहे.

ओवैसीची मुस्लिमबहुल भागात आज पासून बैठका
ओवेसी हे आज संध्याकाळी सहा वाजता औरंगाबाद शहरात येणार आहे.येत्या 19 एप्रिल रोजी  जबिंदा लॉन्स वर ऍड.प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची संयुक्त सभा आहे. सभेच्या तीन दिवस अगोदर ते शहरात येणार आहेत व मुस्लिम बहुल भागात ते आज पासून बैठका सुरू करणार आहे. ओवेसच्या तीन दिवस मुक्कामाने शहरातील  दुरावलेला मुस्लिम मतदार पुन्हा एमआयएम कडे वळेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

तर काँग्रेसचे मुस्लिम पदाधिकारी एमआयएम मध्ये ?
खासदार ओवेसी यांच्या उपस्थितीत  शहरातील काँग्रेस पक्षाचे काही आजी-माजी पदाधिकारी 19 एप्रिल च्या सभेत एमआयएम मध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चेना उधाण आले आहे. मात्र हे पदाधिकारी कोण आहेत या बाबत मौन पाळले जात आहे.
  

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker